भावगंगा - मला लाभले जीवन सुंदर
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
मला लाभले जीवन सुंदर या वृक्षाच्या छायेत
बुद्धी प्रेरणा भाव हृदयिं या प्राण फुंकिले कायेत ॥धृ॥
विश्व सकल फिरलो परि ऐसे प्रेम न भरले नजरेत
पाठशाला ही एक आगळी, उभी मुंबई शहरात ॥१॥
भगवद्गीता आई माझी करते माया दिनरात
खोट्या गोष्टी मला न डसती, उभी न करती कधि भ्रांत ॥२॥
मंत्रलाभ स्वाध्याय आगळा झाला प्रासादिक हात
सुख, दुःख, यश, अपयश कोणाचे भय न मला या जगतात ॥३॥
कमी वदावे अधिक करावे काम, येथली ही रीत
'योगेश्वर की जय हो' केवल घोष पसरतो गगनात ॥४॥
तन मन धन सेवेचा क्रम हा इथे नांदतो मौजेत
साधन-संपत्तीहुनि मानव अधिक, जगीं ही शिकवीत ॥५॥
कृष्ण प्रभू उत्तर प्रश्नाचे हिने ठरविले निश्चित
व्यास- वचन तर विश्व हिताचे सत्य राखिते नजरेत ॥६॥
'पांडुरंग' हा प्राण आणखी योगेश्वर भरला त्यात
व्यासपीठाची शान इथे ही शोभे सुंदर अति शान्त ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP