भावगंगा - भूमी-सागरपुत्रांचे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
भूमी- सागरपुत्रांचे मीलन झाले भावांचे
एक उजवा एक डावा हात पांडुरगाचे ॥धृ॥
नांगर अमुच्या खांदयावरी जाळे दुसरा हाती धरी
भूमी सागर घुसळून काढू माणिक मोत्यांचे, पीक माणिक मोत्यांचे ॥१॥
पाऊस वारा घडी घडी तुफान वादळ सवंगडी
भीती मुळी ना आम्हा कशाची पाईक कृष्णाचे, आम्ही पाईक कृष्णाचे ॥२॥
कामे करू ती कष्टाची देवपूजा ही विश्वाची
धडे गिरविण्या गीता सांगे वेद विचारांचे, हे भाव विश्वासाचे ॥३॥
किती कोसळो वरी संकटे सहयोगेश्वर नाही एकटे
संसाराग्नीमध्ये आम्हांवर छत्र गीतेचे, आम्हावर छत्र गीतेचे ॥४॥
स्वाध्यायाचे कार्य महान त्यात कुणी ना थोर लहान
सर्वधर्मस्वीकार असे हे कुटुंब विश्वाचे, हे कुटुंब विश्वाचे ॥५॥
काटेरी पथ दीपस्तंभ हा वाट दाविती 'दादा' आम्हां
गरुडझेप ती घेऊन चिरू, पोट अंधाराचे, चिरु पोट अंधाराचे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 07, 2023
TOP