भावगंगा - या हो स्वाध्यायाला
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
या हो स्वाध्यायाला तिथे जीवन सर्वांचं फुलतंय
तिथे गीतेचं हो गीतेचं अमृत मिलतंय
तिथे माणूस हो प्रेमाने माणसाला भेटतंय
ज्यांच्या डोईमधी वाईट विचारांचं वारं
त्यांना मिलतंय हो मिलतंय वेदांचं सार ॥१॥
इथे नाही कुणी, नाही गरीब-श्रीमंत
सारे एकाच हो एकाच आईची लेकरं
धर्म संस्कृतीवर साचलाय आज कचरा
तो काढायला स्वाध्याय मार्गच आचरा ॥२॥
कृति-भक्तीचा संदेश दादांनी दिला
प्रयोग मस्त्यगंधा दादांनी आम्हाला दिला
आम्ही ठरविले पांडुरंग आमचा नेता
वैदिक संस्कृतिचा जीर्णोद्धार होईल आता ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2023
TOP