भावगंगा - युवाशक्ती
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
रे ! युवाशक्तीही तू रे पराशक्तीही तू
क्रांतीच्या ज्वालाही तू
प्रेरणा दादांची तुजला, संस्कृतिचा लाल तू ॥धृ॥
क्रूरतेचे राज्य आहे पाहसी जगतात तू
आवरी ना कोणी त्याला नेत्री भरसी अश्रू तू ॥१॥
उठ आता जागवी रे अंतरीचा राम तू
राख गीता वचन ओठी प्रेम न रे ! भाऊ तू ॥२॥
कोसळे आकाश खाली हात देई त्यास तू
शूर हो बलशाली बन तू क्रूरता दे फकून तू ॥३॥
शांती तू क्रांतीही तू वाट शोधी सरळ तू
जागवी युवा ही शक्ती वृत्तीत ऐक्य ठेवी तू ॥४॥
लाभलेली शक्ती अर्पी कार्यी प्रभुच्या धन्य हो तू
राख अपुले नाव प्रभुचा दूत तू स्वाध्यायी तू ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2023
TOP