भावगंगा - त्याग शील
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
त्याग शील सेवा यांचे घेउनिया वाण
देवाचिया कार्यासाठी अर्पू आम्ही प्राण ॥धृ॥
पूज्य संस्कृतीचे वारस आम्ही भाग्यवान
जडवादे केले आम्हा अज्ञ पराधीन
विसरल्या दिव्यतेची करू आठवण ॥१॥
जडतेच्या जाणीवेने होई तिचा नाश
मूळस्थितीरूपी होई वृत्ति तदाकार
सत्य-शिव-सुन्दराचे करू आम्ही ध्यान ॥२॥
विसरल्या ईश्वराचे करूनी स्मरण
इतरांस करवूनी जिंकुया मरण
जागत करूया आपण जन-जागरण ॥३॥
बाल - वृद्ध सर्वांनाही मिळोनिया ज्ञान
घरा-झोपडीतुनि होवो ज्ञान प्रकाशन
दैवी शिक्षणाने आता मिळो आत्मज्ञान ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP