मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
योगेश्वर आहे आमचा प्रमुख

भावगंगा - योगेश्वर आहे आमचा प्रमुख

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


योगेश्वर आहे आमचा प्रमुख
होय, आमचा प्रमुख
त्याच्या पाया पडू, लाभेल सुख
हो लाभेल सुख ॥धृ॥
वेदांस म्हणतात विचार देवाचे
आचार मानवाने त्यातून घ्यायचे
साधेल सारे तर हरेल दु:ख
हो हरेल दॅख ॥१॥
ॠषींच्या तपात भाव प्रभूचा
तेज सूर्याचे, संदेश चंद्राचा
तेजस्वी शीतल देवाचे मुख
दाविती देवाचे मुख ॥२॥
विकास मार्गात निष्ठा प्रभूवर
राखता, होते सृष्टी शुभंकर
भक्तीने जाते सारी रुखरुख
जाते सारी रुखरुख ॥३॥
यज्ञीय निष्ठेत डोंगर प्रेमाचे
भाव पोसती दुबळ्या मनाचे
अस्मिता जागृती त्यात अधिक
हो त्यात अधिक ॥४॥
कार्य आहे हे महामुनींचे
मार्गदर्शन पूज्य दादांचे
आपण त्यांचे होऊ पाईक
हो होऊ पाईक ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP