मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
आता उठतिल योगेश्वर

भावगंगा - आता उठतिल योगेश्वर

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


उष:काल पातला आता उठतिल योगेश्वर
आता उठतिल योगेश्वर ॥धृ॥
लता-तरूंची सुमने हसतिल
तळ्या-मळ्यातिल कमळे फुलतिल
लय-तालावर विहंग गातिल
भरतिल मोदाने मंदिर ॥१॥
भाग्यशाली कर-दर्शन घेउनि
माय क्षमाशिल वसुधा वंदुनि
प्रातर्विधिही पटपट उरकुनि
लवकर गाठु चला मंदिर ॥२॥
लता-फुलांना भाव उमगले
विहंगमांनी गुण गाईयले
मानव पाहिल रूप आगळे
मांगलिक स्वर्गीचे सुंदर ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP