भावगंगा - पांडुरंग आले आले
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
ऋतू वसंतातिल कोकिळ कुहू कुहू बोले
पांडुरंग आले आले पांडुरंग आले ॥धृ॥
मनामनातून वाहे, वाहे चंद्रभागा
चराचरातून आहे भगवंत जागा
निर्झरास भेटायाला तीर्थराज आले ॥१॥
धन्य आज झाली भूमी तीर्थक्षेत्र होता
भावभक्तिच्या भेटीला ज्ञानराज येता
देवरूप होता सगळे अमृतात न्हाले ॥२॥
मृदंगापरी हे झाले मन आज दंग
टाळ-चिपळ्यांच्या ओठी रंगला अभंग
एकतारिला भेटाया नादब्रह्म आले ॥३॥
भक्तिगीत गाता गाता लागली समाधी
रात्र वासनांची सरता गळाली उपाधी
अंतरंग उजळायाला सूर्यबिंब आले ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP