मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
हरिशी एकरूप झालो

भावगंगा - हरिशी एकरूप झालो

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


‍प्रेम अर्पिले भगवंताला भक्तिमधीं रंगलो
हरिशी एकरूप झालो ॥धृ॥
कसे कळावे माझे मीपण
मौलिकता अन्‌ सुंदर सद्गुण
रूप आणखी सर्व समर्पण
लवणापरि विरलो ॥१॥
रुची गुणांची माझ्या कळते
परी न माझे रूप उमगते
कधी जुळले अमुचे नाते
एक वस्त्र ल्यालो ॥२॥
मीठ न गमते पय जळल्याविण
विभक्त कळतो भक्तिरसाविण
मी माझ्यासह प्रभुस समर्पण
निजधामीं धालो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP