भावगंगा - संगतीत दादा तुमच्या
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
संगतीत दादा तुमच्या झालो आम्ही धुंद
विचारांनी जीवनात भरला सुगंध ॥धृ॥
जगत होतो आम्ही केवळ आयुष्याचे भोग
घडविला तुम्ही ज्ञान-कर्म-भक्ती योग
दुःख गेले सरूनी अवघा उरला आनंद ॥१॥
खाणे-पिणे-मजा करणे बनलो असूर
जुळविले जीवनाचे तुम्ही सप्त-सूर
प्रेम-भाव भरला हृदयी जाहलो बुलंद ॥२॥
पुन्हा पुन्हा पाठीवर फिरू देत कर
नाही आता उरली जगती कशाचीही डर
भक्तीच्या शक्तीने झाले भेदाभेद बंद ॥३॥
संस्कृतीच्या कार्यासाठी झिजवू ही काया
जन्मोजन्मी दादा तुमची मिळु देत माया
'पांडुरंग' दर्शनाचा लागला हो छंद ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP