भावगंगा - चला चला रे स्वाध्यायींनो
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
चला चला रे स्वाध्यायींनो, तीर्थयात्रेला जाऊ चला
भक्तिफेरिचे व्रत आचरुनी, कृतिभक्तीला उजळु चला ॥धृ॥
असे वारसा ॠषी-मुनींचा
पवित्र प्रेमळ मानव्याचा
दिव्य मंत्र हा उपनिषदांचा
हृदिं कवटाळु चला गड्यांनो, गावोगांवी जाऊ चला ॥१॥
गावोगांवी घराघरातुनि,
जाउनि भेटू बंधू-भगिनी
परिचय त्यांचा घेऊ करूनी
स्वाध्यायाचे विचार सांगुनि, पाठ आपुला घोटु चला ॥२॥
मानव तितुका एकचि आहे
उच्च-नीच हा भेदचि नोहे
हृदीं जनार्दन नांदत आहे
त्या देवाला वंदन करुनी, मळा भक्तिचा फुलवू चला ॥३॥
सवे घेऊनी एकेकाला
नाचत गाऊ प्रभु-भजनाला
चला चला रे तीर्थयात्रेला
प्रणाम करुनी त्या संताला भावपुष्प हे अर्पु चला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP