भावगंगा - स्वाध्याय बनवील जीवन कवन
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
निष्ठेने कर नित थोडे श्रवण, कर थोडे श्रवण
स्वाध्याय बनविल जीवन कवन रे जीवन कवन ॥धृ॥
नकोस समजू मृत्यूस अन्त रे मोल वस्त्राचे त्याला पुरे रे
रंगवी भक्तीने सारे जीवन, रे सारे जीवन ॥१॥
सत्य सिद्धांत जाणून घे रे फुलव श्रद्धा नि मेधा तशी रे
प्रभुस अनुकूल ते आचरण, कर ते आचरण ॥२॥
काशी, हिमाचल, गंगा पावन रे त्याहूनि पावन संतांची प्रीत रे
ॠषि, मुनि, भगवंत त्यांचे चरण, रे त्यांचे चरण ॥३॥
केवळ भोगांना चिकटू नको रे भाव पुष्ट करी आर्द्र जीवन रे
सख्य भक्तीने विभूति दर्शन, रे विभूति दर्शन ॥४॥
यज्ञीय दृष्टी तू कामात राख रे सत्य नारायण एकच मान रे
संघासाठी कर अहम् दहन्, कर अहम् दहन ॥५॥
सर्व शक्तींचा प्रभू विधाता त्याची प्रेरणा, त्याचीच सत्ता
त्याला नेमाने जावे शरण, रे जावे शरण ॥६॥
वित्त नि बुद्धिही प्रभु-प्रदान रे अमूल्य बक्षीस आगळे जाण रे
प्रभुसाठी रे त्याचे हवन, कर त्याचे हवन ॥७॥
पूज्य दादांचे कार्य महान रे जाणून घे नि बनव शान रे
चिन्तन चालू दे, नित्य श्रवण, रे नित्य श्रवण ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2023
TOP