भावगंगा - संत तयां वदती
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
संत तयां वदती जगीं या
सरळ बोलती, सरळ चालती, सरळ असती
जगीं या संत तयां वदती ॥धृ॥
जग देवाचे जीव देवाचा निर्माता तो चराचराचा
चाले सगळे त्याची इच्छा; समज मनीं धरती
जगीं या संत तयां वदती ॥१॥
माझ्याहुनि ना देव वेगळा भ्रातृभाव जीवनात गुंतला
हृदय हलविते ईश्वरलीला; समज मनीं धरती
जगीं या संत तयां वदती ॥२॥
अनुपम प्रीती देवावरती करुणा साक्षात् जीवन जगती
मंगलतेच्या घडविन मूर्ती; समज मनीं धरती
जगीं या संत तयां वदती ॥३॥
प्रभु-इच्छेचे साधन जीवन माझे मीपण त्यास समर्पण
अनन्यभावे चरण-शरण मी; समज मनीं धरती
जगीं या संत तयां वदती ॥४॥
सलगीने जरी देव बांधला मृत्यू बदलिल निज वचनाला
नको विधीमधिं हात आपुला; समज मनीं धरती
जगीं या संत तयां वदती ॥५॥
रंग वेगळे भाव वेगळे पांडुरंगी विश्व साठली
धवलपणाचे रूप आगळे; समज मनीं धरती
जगीं या संत तया वदती ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP