मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
दिली कुणी आम्हा शक्ती

भावगंगा - दिली कुणी आम्हा शक्ती

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


द्या, द्या आम्हाला उत्तर नीट करुनिया सुविचार
या जगतामधिं येण्याची दिली कुणी आम्हा शक्ती ॥१॥
डोळे अमुचे लुकलुकती निरांजनांच्या जणु वाती
गमती जमती बघण्याची दिली कुणी आम्हा शक्ती ॥२॥
लुटुलुटु आम्ही चालतो दुडुदुडु आम्ही धावतो
इकडुन तिकडे जाण्याची दिली कुणी आम्हा शक्ती ॥३॥
तोंडाने आम्ही बोलतो छान छान खाऊ किति खातो
खाऊची मज्जा चाखण्याची दिली कुणी आम्हा शक्ती ॥४॥
नव्हते दात तोंडात तेव्हा होतो दुध पीत
नंतर अन्न पचविण्याची दिली कुणी आम्हा शक्ती ॥५॥
शिकतो खेळतो धडपडतो झोपेत सारे विसरुन जातो
तेच पुन्हा आठवायची दिली कुणी आम्हा शक्ती ॥६॥
आता आम्हीच देतो उत्तर देवच सर्वांहुनि थोर
देणगी त्याच्या प्रेमाची म्हणुन मिळाली ही शक्ती
आता आम्हीच देतो उत्तर ॥७॥
अश्शा प्रेमळ देवाला हवेच नियमित आठवाया
मग त्याचे लाडके होण्याची देईलच तो आम्हा शक्ती
आता आम्हीच देतो उत्तर ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP