भावगंगा - हे योगेश्वर भगवान !
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
हे योगेश्वर भगवान ! घेई रे नमन-सुमन पहिले ॥धृ॥
निमित्त झाला तिसरा पांडव
उठविलेस तु त्याचे गांडिव
समोर ठेवुनि त्याला श्रीहरि ! गीतेला कथिले ॥१॥
आश्वासक धीराची वचने
दिली तिच्यातुन तऱ्हेतऱ्हेने
गलित मनाला कर्तृत्वाचे पाठ पुढे लाभले ॥२॥
विश्व सकल तव बालक कथिले
पुत्र - पित्याचे नाते रचिले
वात्सल्याच्या त्या किमयेतुन विश्वा बांधियले ॥३॥
ठाण मांडिले अंतर्यामी
पल्याड भीती राखुन जुलमी
निर्भयतेचे सुख भोगित हे जीवन मोहरले ॥४॥
विकास माझा नित्य घडावा
नीति, रीति, संस्कार जडावा
सहज वळावे तुझ्याकडे ते सगळे सांगितले ॥५॥
अजोड उपकारात तुझ्या मी
पुढे तरी तव यावे कामी
अल्पस्वल्प ऋणमुक्ति घडावी म्हणुनि चरण धरले ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP