भावगंगा - नाचत गावू मंगल गान
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
नाचत गावू मंगल गान
अमुचा योगेश्वर भगवान ॥धृ॥
चक्रधारी हा उभा भूवरी
गीता मुरली दुंदुभी भेरी
करतो जगताला आव्हान
अमुचा योगेश्वर भगवान ॥१॥
निर्भय सुस्थिर उभे रहा रे
सुटतिल झंझावाती वारे
दृढतर एकच आश्रयस्थान
अमुचा योगेश्वर भगवान
सागर पिउनी मस्त होउया
हिमालयाचे चूर्ण करूया
सांगे संस्कृतिचे महिमान
अमुचा योगेश्वर भगवान ॥३॥
जन्मजात पाठिशि जरि अन्त
माझ्यापरि मानव भगवंत
निश्चय शिकवी त्याचे ध्यान
अमुचा योगेश्वर भगवान ॥४॥
कणाकणाने शक्ति वाढवा
विश्वाला पोटात साठवा
प्रेमच अवघे उरवी भान
अमुचा योगेश्वर भगवान ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP