भावगंगा - श्रीहरिचा अवतार
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
दिसतो साधा असतो साधा
पांडुरंग साकार, मनुज हा
श्रीहरिचा अवतार ॥धृ॥
लोभस व्यक्ती अद्भुत शक्ती
जीवन फुलवी तेज विरक्ती
पावित्र्यातील सदा नांदतो
युक्ति-बुद्धि-झंकार ॥१॥
गीता-रस वाटित फिरतो हा
संजीवन, अमृत मृत देहा
बिंदु बिंदु सुख दाखवि जीवा
रक्षि नित्य सहकार ॥२॥
स्थितप्रज्ञ हा, कर्मयोगी हा
गुणातीत हा, पुरुषोत्तम हा
संस्कृतिसंगे जुळलेला जीव
प्रेम एक स्वीकार ॥३॥
सदा बसावे चरणाजवळी
जीवन-कोडी उकलित सगळी
तुष्ट पुष्ट जीवन अर्पावे
चरणी कुसुमाकार ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023
TOP