भावगंगा - शरीर माझे क्षेत्र असे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
शरीर माझे क्षेत्र असे
मी तर आत्माराम असे ॥धृ॥
कळले मजला कोण असे मी
नाते कळले कोणाचा मी
मला लागले प्रेम पिसे ॥१॥
कळले मजला जीव असे मी
जगत असे, जगदीश असे मी
स्पर्श आतला दिव्य असे ॥२॥
जाणवले मज अनंत झालो
दु:ख उचलता उन्मन झालो
फूल उमलते सांगु कसे? ॥३॥
खुणाविती मज नाथ, नामया
जागविती मज समर्थ, तुकया
‘पांडुरंग’ मज तीर्थ असे ॥४॥
मी तर आतून झपाटलेला
बाहेरून मी मंतरलेला
भरून गेलो ब्रह्मरसे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP