भावगंगा - स्वाध्यायी लक्षण
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
घरात ज्यांच्या त्रिकाळसंध्या करिती सगळेजण
तेची स्वाध्यायी लक्षण ॥धृ॥
उठुनि सकाळी स्वकरी बघती
भगवंताची मंगल मूर्ती
मंगल त्यांचे जीवन सगळे, मंगल होतो दिन
तेची स्वाध्यायी लक्षण ॥१॥
भोजन पुढती येता ज्यांना
स्मरते प्रभुची प्रेमळ करुणा
त्या करुणेतुनि शक्ति वाढता पुष्ट होतसे तन
तेची स्वाध्यायी लक्षण ॥२॥
मुखात येता नाम प्रभूचे
सुखे झोपती डोळे ज्यांचे
त्या सौख्यातुनि शान्ति लाभता प्रफुल्ल जे जीवन
तेची स्वाध्यायी लक्षण ॥३॥
योगेश्वर पूजन ज्या जागी
गीता-पठनाने अनुरागी
कृतीभक्तीने सारे मिळविती शत जन्माचे धन
तेची स्वाध्यायी लक्षण ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2023
TOP