भावगंगा - करुन स्वाध्याय कधी एक दिन
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
करुन स्वाध्याय कधी एक दिन करित जा स्वच्छ मन अपुले
प्रभूच्या मार्ग तो घरचा तयावर राख पदकमले ॥धृ॥
क्षणाचे सौख्य या जगतीं जिवाला बांधिले त्यात
कधी तरि एक दिवशी ये प्रभूचे प्रेम भर त्यात ॥१॥
निराशा नाही प्रभु-गेहीं जगाचा स्वामी सुख देई
घेई श्रद्धेस ये पुढती पसर कर दोन्ही लवलाही ॥२॥
भरिल ओंजळ प्रभू तुझी मनाची जोड तू मर्जी
सांगते सर्वकाळ गीता प्रीतीने देत जा अर्जी ॥३॥
शांति वा सौख्य ना पैसा भ्रमाचा भोपळा फुटतो
अलौकिक मोद प्रभुचरणी एकदा स्वाद घे, म्हणतो ॥४॥
फिके सगळे तयापुढती भलभले रंगही उडती
मनीं धर ‘पांडुरंग’ आता प्रभूची दाखविल मूर्ती ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 07, 2023
TOP