भावगंगा - भक्ती ही शक्ती उद्याची
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
भक्ती ही शक्ती उद्याची हे जगा कळणार आहे
फक्त ईश्वरवाद आता यापुढे उरणार आहे ॥धृ॥
शोषितांची, पीडितांची संपली सारी उपेक्षा
अस्मिता शिकवील गीता ना कुणी मागेल शिक्षा
झोपडीच्या कुंडलीची ग्रहदशा मिटणार आहे ॥१॥
पंडितांची पढिकता कार्यास लाविल का कधी?
पांगळा पुरुषार्थ त्यांचा तरुण उठविल का कधी?
कृष्ण हा येत्या पिढ्यांना प्रेरणा देणार आहे ॥२॥
क्रान्तदर्शी जाणत्यांना यापुढे पर्याय नाही
कर्म-भक्तीच्या विरोधी, ते जगीं टिकणार नाही
वाट चुकलेल्यास रस्ता या इथे दिसणार आहे ॥३॥
पंचरंगी क्रान्तिचा ‘निर्घोष’ येथे चालला
श्वास अन् नि:श्वास अमुचा विश्वव्यापक जाहला
पांडुरंगी वामनाला जग थिटे पडणार आहे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2023
TOP