भावगंगा - हरिचा गजर करतो
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
हरिनाम घेउनी मी गरगर जनात फिरतो
दगडात प्राण फुंकुनि हरिचा गजर करतो ॥१॥
हातात एक अवघी गीता, मुखात नाम
हृदयात एक भगवंत त्याला प्रणाम करतो ॥२॥
अनुभूति दाटलेली श्रवते मुखात वेगे
गुंफूनि भाव नाना हरिनाम गोफ विणतो ॥३॥
या थोर सान सगळे सांगा कसे हो वदता
तो सूर दाबतो अन् रसनेत शब्द घुमतो ॥४॥
खाता अमाप सगळे पोटात यंत्र फिरते
रक्तात पलट त्याचा तेथे बसून करतो ॥५॥
‘तो थोर देव एक त्याला तुम्ही भजावे’
सांगून ते जनांना पुढती निघून जातो ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP