भावगंगा - हरि-भक्तीचे स्थान
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
हरि-भक्तीचे स्थान एकच मानव-देह महान ॥धृ॥
क्षुद्र का बरे गणसी त्याला
मंदिर गमतो हरि-दृष्टीला
निशिदिन त्यातच तो बसलेला
सावरि झुलते ध्यान ॥१॥
हरिद्वार इन्द्रियगण सगळे
शिक्षण देई त्यांस आगळे
भरले संतोषे फुललेले
पाही मग ती शान ॥२॥
विषय-खुळखुळे खेळासाठी
इंद्रिय-साधन भोगासाठी
देह तसा तो देवासाठी
तीर्थांचे करि स्नान ॥३॥
यम-नियमांना मानी साधन
मन-बुद्धी विषयांचा मालक
स्थिरचर धैर्याचा जणु धारक
गाया हरिचे गान ॥४॥
भक्त एक प्रभुप्रेम पाहतो
विषयांमध्ये हरी निरखतो
भोगांना भगवान समजतो
धारक प्रभु गतिमान ॥५॥
सिद्ध सदा मस्तीत नाचती
मनात वसते विषय-उपरती
भवजल तरती पार उतरती
नौकेचा त्या मान ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP