मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
एकच योगेश्वर भगवान

भावगंगा - एकच योगेश्वर भगवान

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


स्वाध्यायींचे स्फूर्तिस्थान
एकच योगेश्वर भगवान ॥धृ॥
त्याविण जीवन व्यर्थ पसारा
विषय, वासना, स्थान विकारां
गतकालातील कर्म अजाण
गाईन योगेश्वर भगवान ॥१॥
विशुद्ध जीवन स्वाध्यायाने
योगेश्वर करितो प्रेमाने
स्वाध्यायाचे ते महिमान
गाईन योगेश्वर भगवान ॥२॥
अनंत गेले जन्म फुकाचे
आज नाव सार्थक मनुजाचे
कृपण न बनता घेईन मान
गाईन योगेश्वर भगवान ॥३॥
देव न गणतो अपराधांना
भक्त-जनांच्या पुऱ्या कामना
करता, सरते नित दिनमान
गाईन योगेश्वर भगवान ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP