भावगंगा - क्षणभरशा जीवनाला
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
क्षणभरशा जीवनाला युगयुग सांभाळशी
जग! धरो रे तुला, योगेश्वर उराशी ॥धृ॥
दिले ज्याने जीवन सुंदर
सोडू नको त्याला
जोड, जोड नाते त्याशी
तोडू नको त्याला
व्यवहारे जगावे; पण राहो तो धीराशी ॥१॥
क्षणाचे हे जीवन सगळे
निरर्थक न काही
प्रसाद प्रभूचा आहे
प्रभूने दिलेली लाही
कर्तृत्व असावे जवळी, शरीर का शृंगारशी? ॥२॥
देतो तोच परतही मागे
स्वत:चे दिलेले
सूचना न देता येईल
न्यावया स्वत:चे
म्हण; ‘योगेश्वर! या हो! उभा मी दाराशी!’ ॥३॥
दिले आहे जीवन त्याने
म्हणुन द्यावे लागे
गोंधळतो तेव्हा मानव
येती अश्रू वेगे
कारण, जीवनाच्या बागेत मृत्यू रहिवाशी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP