मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
आले स्वाध्यायी गावात

भावगंगा - आले स्वाध्यायी गावात

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


आले स्वाध्यायी गावात
करू प्रेमभरे सुस्वागत ॥धृ॥
सांगती प्रभुच्या मंगल गोष्टी
भरली प्रभुने सगळी सृष्टी
बदलूनि बघ तव निज-दृष्टी
तो गमतो सकल थरात ॥१॥
शोधा दिवसातुनि क्षण एक
बांधा नियम नि नित्य विवेक
श्रीहरि मिटविल तुमचा शोक
तो घुसतो भक्त-घरात ॥२॥
कशास पळता रानोमाळीं
शोधित ग्रंथीं अन्‌ राऊळीं
कर्मयोग फुलता भवताली
हरि दरवळ भरि हृदयात ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP