भावगंगा - घेतली मी शपथ दादा !
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
घेतली मी शपथ दादा ! कार्य तुमचे मम करीं
द्या मला आशीष आता झेप हो गरुडापरी ॥धृ॥
विश्व मोठे, चिमुकला मी, खंत नाही ती मला
सिंहछावा रोज पुसतो कोण गर्जे हा भला?
'स्वामी मी' दावा करूनी रानिं राहे केसरी
पाजिल्या दुग्धात तुमच्या ती खुमारी, माधुरी ॥१॥
वैदिकांचे विश्वदर्शन दाविले तुम्ही मला
अर्जुनाची शक्ती मोठी शौर्य होते निश्चला
होई तो आयुध प्रभूचे शान्तिसाठी संगरीं
त्याच पंथें पाउले ही पोचती दारीं, घरी ॥२॥
साठले वात्सल्य हृदयीं, दाटल्या नाना कळा
निश्चयी मतिमान् विचारी बनविले तुम्ही मला
खेळ आता पाहि म्हणतो, कौतुके बसुनी घरीं
शान्त होती नेत्र पाहुन विश्व हिरवे केसरी ॥३॥
सांगतो करुनी प्रतिज्ञा भ्रातृता वाटीन मी
मत्सराचा छेद करुनी वासना जाळीन मी
ऐक्य, शान्ती, प्रीती स्थापिन मानवाच्या मंदिरीं
विश्व स्वाध्यायी बनावे हीच आशा अंतरीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP