भावगंगा - स्वाध्यायाची वाट आगळी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
नव्या युगाची पहाट पहाण्या
दादांची ती हाक आली
स्वाध्यायाची संगत आता, युगायुगांची साथ जाहली ॥धृ॥
नको कुणाचे घेणे देणे,
नव दृष्टीचे नवीन लेणे
मरगळल्या आत्म्यास जागवी, स्वाध्यायाची वाट आगळी ॥१॥
माणुस म्हणुनी जगण्यासाठी
माणुस म्हणुनी जगण्यासाठी
माणुसकीचा मार्ग दाविते, स्वाध्यायाची वाट आगळी ॥२॥
विस्मृतीच्या मागोव्याने
श्रुति-स्मृतींशीं जोडुन नाते
ॠषि-मुनींचा आदर्श ठेविते, स्वाध्यायाची वाट आगळी ॥३॥
उपनिषदांचे सार जाहली
स्कंदपुराणे मंथन केली
गीतेला गात्रात भिनविते, स्वाध्यायाची वाट आगळी ॥४॥
दादांची ही अमृतवाणी
नव्या युगाची नवसंजीवनी
भगवंताची भाव-समाधी, स्वाध्यायाची वाट आगळी ॥५॥
N/A
N/A
References : N/A
Last Updated : September 10, 2023
TOP