भावगंगा - प्रभुविचार देऊन आलो
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
गावा गावात जाऊन आलो
प्रभुविचार देऊन आलो ॥धृ॥
जरा पहाट फुटत होती
नभीं चांदणी झुकत होती
पाणी गृहिणी भरीत होती
सडा, रांगोळी करीत होती
जागा माणूस, करून आलो ॥१॥
बाल गोपाळ खेळत होते
नदीनाल्यात डुंबत होते
घराघरांत भांडत होते
कुणी चकाट्या पिटीत होते
कथा कृष्णाची, सांगून आलो ॥२॥
कुणी वयाने झुकले होते
तनमनाने खचले होते
काही बरेच शिकले होते
वाद प्रेमाने घालीत होते
उभा माणूस, करून आलो ॥३॥
कुणी संसारी विटले होते
अंधश्रद्धेत फसले होते
काही भोगात रुतले होते
भाव भक्तीस मुकले होते
डोळा भक्तीचा, देऊन आलो ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP