भावगंगा - दादांचे विचार घेउ द्या की रं
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
दादांचे विचार घेउ द्या की रं
भक्तिफेरीस मला येउ द्या की रं ॥धृ॥
हाती गीतेची भाकरी सवे प्रेमाची साखरी
प्रभु-कामाची चटणी खाऊ भावाची फुटाणी
अरे, ज्ञानाची शिदोरी घेउ द्या की रं ॥१॥
फुंकू दगडामध्ये प्राण वाढवुया धरतीची शान
जीवन बनवूया निर्मळ जसं चिखलातिल कमळ
अरे, कर्माची प्रेरणा घेउ द्या की रं ॥२॥
सुख-दुःखें ही जीवनी प्रभु प्रसाद त्यांना मानी
दगड धोंडे आणि हे काटे लावु त्यांनाच आपण वाटे
गाडी भक्तीच्या मार्गाने जाउ द्या की रं ॥३॥
जीवन ध्येय घेऊ बरोबर गीता नेउ घरोघर
आता झटकुया आळस खरे लागू प्रभू कामास
अरे, कृष्णाचं नाव आता घेउ द्या की रं॥४॥
करू सिंहासम गर्जन, करूया रामराज्य सर्जन
नाही भीतीचं कारण रचू राक्षसांचं सरण
अरे, देवदत्ताला फुंकु द्या की रं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 07, 2023
TOP