भावगंगा - नारायण मंत्र
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
नारायण मंत्र जपत हिंड तू जगात
कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करात ॥धृ०॥
देवाचे रम्य जगत भवति पसरले
प्रीतीचे मंगलमय रूप आगळे
प्रीतिमधी प्रीत भरित हिंड तू जगात ॥१॥
हसऱ्या या नंदनवनिं मोद नांदतो
कणकण भगवंत बनुनि लहर लहरतो
लहरित त्या निरखित प्रभु हिंड तू जगात ॥२॥
लपुनि नाही हरि उघडा जगतिं राहतो
निर्माता, संचालक, साधक, गति तो
पकडुनि ती अचुक गती हिंड तू जगात ॥३॥
डोळ्यावर पटल चढे मीपणातले
अंधत्वा वरुनि लोक विसरती भले
अंजन त्या नयनिं भरित हिंड तू जगात ॥४॥
पसरुनि बाहूंस पुढे देव तिष्ठतो
भक्तीच्या अंगणात तोच भेटतो
दाखवीत अंगण ते हिंड तू जगात ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP