भावगंगा - तरुण होऊया, तरुण राहुया
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
तरुण होऊया, तरुण राहुया
दक्ष राहुया, तरुण राहुया ॥धृ॥
रडायचे ना जीवनी
ही बंद करून मागणी
बालिशता उल्लंघुनि वयस्थ होऊया ॥१॥
निराशा देऊ फेकूनि
चिंता टाकू जाळूनि
कात टाकूनि जुनी गृहस्थ होऊया ॥२॥
आशिष्ठता, दृढीष्ठता
बलिष्ठता, वरिष्ठता
सरलता अंगी बाणुनि युवान होऊया ॥३॥
करारी दृढ-निश्चयी
व्रतस्थ आणि संयमी
वादळाशी झुंजण्या तुफान होऊया ॥४॥
हाती घेऊनि गीता
प्रेम हृदयी गीता
गावोगावी जाऊनि व्रतस्थ होऊया ॥५॥
करूनि युद्ध गर्जना
सज्ज होऊ रे सर्जना
प्रभूशी प्रेम बांधूनी मनुष्य होऊया ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2023
TOP