भावगंगा - विद्यापीठ
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
विद्यापीठी जाता भेटे योगेश्वर
भक्तीचा अपार तेथे पांडुरंग
तेथे सरस्वती वाहते दुथडी
ज्ञान हरघडी सांगतो श्रीरंग ॥धृ॥
‘जगावे आपण, दुसरा जगावा’
साधन, सांगावा भरी नित्य रंग
हिरवे जीवन तेथे अंकपुते
प्रेम आकारते, घडे सत्यसंग ॥१॥
भक्तीचा जिव्हाळा तेथे अनिर्बंध
नाचतो स्वच्छंद, आपुल्यात दंग
तेथे तरु-वेली, फुलें गणगोत
जागविते भक्ती मधुर तरंग ॥२॥
तेथे सांगे वारा घेऊन जा ‘राम’
शान्त, समाधानी भावना-प्रसंग
आल्यागेल्या तेथे लाभते विपुल
तेथे ज्ञानालय गीता-अनुराग ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP