भावगंगा - आशीर्वच द्या आता
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
वैजनाथ श्री पिता दयाळू जोगाई माता
भक्तीफेरी करून आलो आशीर्वच द्या आता ॥धृ॥
त्रिकाळसंध्या घेऊन गेलो
'देव आठवा' सांगुन आलो
मागितले ना कोणापाशी योगेश्वर हा दाता ॥१॥
आम्ही न कोणी धर्मप्रचारक
उपदेशक ना जगदुद्धारक
श्रीकृष्णाचे नम्र उपासक आलो देऊन गीता ॥२॥
मरण अटळ परि ध्येय असावे
भीती सोडुन कर्म करावे
मार्कंडेया नित्य स्मरावे-उठता, बसता, गाता ॥३॥
खेचर, नामा, एका तरले
दत्त दिगंबर दासो वदले
साधुत्वचि हे त्यांचे उरले मार्ग नसे या परता ॥४॥
नमन आमुचे या भूमीला
वंदन इथल्या आद्य कवीला
वैजनाथसुत पांडुरंग हे चरणी ठेविती माथा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 07, 2023
TOP