भावगंगा - तुझ्यात राम
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
तुझ्यात राम माझ्यात राम सर्वाभूतीं राम रे
जगात करि तू प्रेमच केवळ कुणी वेगळा नाही रे ॥धृ॥
विश्वातिल या कणाकणातुनि रामच भरला आहे रे
काळातिल या क्षणाक्षणातुनि रामच केवळ आहे रे
विश्व चालवी काळ वेळ ही ती रामाची अंकित रे ॥१॥
संशय सोडुनि सगळे आता रामनाम तुम्ही घ्यावे रे
तारिल तुम्हां सर्वांमधुनी अनन्य ठेवा भाव रे
अमोल दुर्मिळ आयुष्याचा नका करू तुम्ही नाश रे ॥२॥
सागरातले मौक्तिक जैसे मौलिक त्याचे तेज रे
मानव तैसे दिव्य अलौकिक झाकळले ते पुरे पुरे
प्रभुकार्यी ते गुंफुनि सगळे करुया सार्थक खरेखुरे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2023
TOP