भावगंगा - कलियुगीं चक्रपाणी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
भाट कुणी आला द्वारी गाई यशोगाथा, गाणीं
म्हणे पाहिला डोळ्यांनी योगेश्वर चक्रपाणी ॥धृ॥
माथी नव्हता मुकुट, कासोटीला पीतांबर
होता वेष श्वेत फक्त आणि गीता मुखावर
पाच हजार वर्षांची ओळखली दिव्य वाणी
तोच भाव, तेच प्रेम, मन झाले वेड्यावाणी ॥१॥
'गीतामृत' प्राशिले मी झालो चैतन्याचा पक्षी
हिंडतो मी गावोगांवी रुची बाळगून वक्षीं
वाटले सांगाव्या खुणा, अलंकार, सर्व लेणी
भ्रम अवघा सांडोनी, ओळखा हो त्याला कोणी ॥२॥
त्याला म्हणतात ऋषी परी भासे हृषिकेशी
जातो सान-थोरांपाशी फोडी दुराव्याच्या राशी
देव फिरे त्याच्यातून कलियुगीं चक्रपाणी
'पांडुरंग' म्हणे कोणी, 'दादा' लाडात येवोनी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP