भावगंगा - एकटा तर एकटा धाव घे तरूणा !
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
एकटा तर एकटा धाव घे तरूणा !
संस्कृतिच्या हाकेला, मातेच्या सेवेला
संस्कृतिसाठी, देवासाठी क्षण देतो तो भला ॥धृ॥
नको घेऊ विश्राम कुणाची वाट नको पाहू
एक भरवसा हर व्यक्तीला आपुलाच बाहू
कणव दाटु दे तुझ्या लोचनी वाचव आईला
हा येतो का तो येतो का विचार सोड मुला ॥१॥
म्हणसी काटे किती दु:खाचे वाटेवर पडले
पद-पद विघ्ने छळती, पाडिती हृदयाची छकले
सत्याला नित विरोध जगती, मान असत्याला
जाण ठेव ही तुझ्या मनामधि सुपुष्प ने भटिला ॥२॥
नको गोंधळू, नको टाकु, कधि सत्पथ पदतळिचा
सुकेल काया, कापति पदही, अबोल हो वाचा
उपाय नुरतिल, अपाय दिसतिल, पुकारू कोणाला
मनात आठव एक प्रभू तू त्याच्या प्रेमाला ॥३॥
मिळेल सोबती त्याला मानी प्रभुने पाठविला
सोडुन कोणी जाईल त्याला प्रभुने बोलविला
आला गेला प्रभुची इच्छा खंत नको ती तुला
तू सर्वांचा प्रियतम बन रे ! स्नेहाने बांधला ॥४॥
गीता गाणार तू गायक, नायक जगताचा
श्रीकृष्णाच्या कार्यासाठी, जन्म तुला लाभला
जाई घरोघरी सांग प्रभूच्या लीला, लाघव कला
तरूण बुद्धीने, सबल मनाने, जन जन कर आपुला ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2023
TOP