भावगंगा - हवेत वैष्णव आज असे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जीवित ज्यांचे पुष्प सुगंधित पूर्ण उमलले पद्म जसे
हवेत वैष्णव आज असे ॥धृ॥
पायतळी अंगार, चालती
तळ हातावर सूर्य झेलती
पिती निखारे तरिहि त्यांच्या वदनावरती स्मित विलसे ॥१॥
आचमनीं जे सिंधु प्राशिती
जन्मोत्सवि जे भास्कर गिळती
चालत आली कटकशतें जरि मनात निर्भय ब्रह्म असे ॥२॥
दुःख, दीनता तिथे धावती
मेघ शुभंकर होउन झरती
कर्तृत्वाचा मोहर ज्यांच्या कृतीमधूनी सहज दिसे ॥३॥
मौनीं पिकती मळे मुक्तिचे
दर्शन ज्यांचे सृजन शक्तिचे
दृष्टि चंदनचर्चित भासे चरित जयांचे मुनिवरसे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP