भावगंगा - उठ उभा हो कार्यासाठी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
उठ उभा हो कार्यासाठी त्यातच आत्मोद्धार
तुझ्यामधुनिया घडणे आहे जगताचा उद्धार ॥धृ॥
भोगलालसार भरली जगती
जीवहि त्याच गुंतुनि पडती
नको सापडू भोगकर्दमी कर तू बुद्धिप्रहार ॥१॥
काय करू मी कसे करू मी
कसे सावरू या जगता मी
नको करू ही चिन्ता नसती त्यातच असते हार ॥२॥
पुत्र लाडका तू देवाचा
विचार करि तू या गोष्टीचा
वाग असे तू मिळे जयातुनि देवाचा देकार ॥३॥
नरजन्माची महती हाती
पुरुषार्थाच ज्योत तेवती
वचनबद्ध हो करण्यासाठी तेजाचा स्वीकार ॥४॥
लाव शक्ती तू आहे जितुकी
मिळेल तुजला अधिक हवी ती
माग मदत तू गरज भासता असते ती तैयार ॥५॥
जीवन तव जे रसरसलेले
यौवन तव जे आसुसलेले
लाव करिणी जगत-पित्याशी करूनी आज करार ॥६॥
जीवन सुंदर करण्यासाठी
पुष्प सुगंधित होण्यासाठी
त्यातच आहे नर-जन्माच्या महतीचा स्वीकार ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP