मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
भीतीची नाही तमा

भावगंगा - भीतीची नाही तमा

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


भीतीची नाही तमा आज राहिली
जीवनाची दोरि प्रभू-हातिं दीधली ॥धृ॥
पापाची पडछाया लुप्त जाहली
कामाची पकड पुरी नष्ट पावली
मम मनात पुण्याची मूर्ती ठाकली ॥१॥
भय गेले उरले ना, नाव अन्‌ निशाण
जीवन-मरणात गमे भक्तिचे उधाण
सृष्टि सकल आणि प्रभू-साथ लाभली ॥२॥
दु:ख नव्हे सुप्रसाद पाठवी प्रभू
मस्त मीहि जीवनात नाचतो विभु
दु:ख आणि सौख्याची धुंदी संपली ॥३॥
मानसास त्यजुनि पळे दीनता दुरी
लाचारी-गरिबीला स्थान ना घरीं
हृदयामधिं राम वसे, मान ऊठली ॥४॥
साधनास, संपत्तिला आणि अहम्‌ला
मूठमाती देउन मी, वरिले गुणाला
‍सैनिक मी सानुलाच याच भूतली ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP