मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
निरोप

भावगंगा - निरोप

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


आज घेउया निरोप आपण विरह दाटतो उरीं
असू द्या प्रेमच सर्वांवरी ॥धृ॥
अंतरिच्या प्रेमाने आपण
जमलो येथे नित्य सर्वजण
स्वाध्यायाच्या दिव्य व्रतास्तव
उज्ज्वल निष्ठा खरी
असू द्या प्रेमच सर्वांवरी ॥१॥
नर-जन्माचे भाग्य मिळाले
महत्त्व त्याचे खरे समजले
ओळखण्याची अपुल्या आपण
उज्ज्वल निष्ठा खरी
असू द्या प्रेमच सर्वांवरी ॥२॥
प्रपंच करता नित्य आठवण
ठेऊया देवाची आपण
मंगलमय तो सदाच होईल
उज्ज्वल निष्ठा खरी
असू द्या प्रेमच सर्वांवरी ॥३॥
शरिराने जरि विभक्त होऊ
मन-प्रेमाने एकच राहू
प्रभुकार्यास्तव काया अर्पू
उज्ज्वल निष्ठा खरी
असू द्या प्रेमच सर्वांवरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP