भावगंगा - दरवळे आसावरी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
चांदणे शिंपीत जाते मुक्त ह्याची वैखरी
रंगता संवाद, गोष्टी दरवळे आसावरी ॥धृ॥
ज्ञानगंगेच्या तटावर एक योगी राहतो
कर्म-भक्ती-पंख लेवुन नित्य तेथे विहरतो
भुक्ति-मुक्ती लोळताती ह्याचिया चरणावरी ॥१॥
मोरपंखी हास्य ह्याचे सांडते नजरेतुनी
भाववेडे पीत बसती गारवा हा चंदनी
ह्याचिया श्वासामधूनी डोलती तरुवल्लरी ॥२॥
मखमली शब्दामधूनी मूर्तिपूजा चालते
गंधसुमने लेवुनी लक्ष्मी स्वयं आकारते
पंचरंगी गोफ विणते उपवनातिल बासरी ॥३॥
तीन वेळा रोज संध्या होतसे या सागरीं
'मत्स्यगंधे'च्या उरातुन गंध येतो कस्तुरी
नाम ह्याचे घेउनीया धन्य होतो श्रीहरी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP