भावगंगा - विनम्र होउन काम करी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
विनम्र होउन काम करी रे ! देईल तो मग मान
जीवन आहे देवासाठी, तोच खरा अभिमान ॥धृ॥
अल्पस्वल्पशा कलागुणांनी फुगणे अवनति समजावी
कलाकुशलता अपुर्नि चरणी शाबाशी प्रभुची ध्यावी
भीक मागणे सोड, रंग तू, प्रार्थनेत भर प्राण
जीवन आहे देवासाठी, तोच खरा अभिमान ॥१॥
लाभाकांक्षा टाकुन कर तू कर्मयोग दिनरात
करुणामय मग अविरत राखिल लाभाची बरसात
सोड लोभ, आसक्ती; बन तू प्रेमाचा धनवान
जीवन आहे देवासाठी, तोच खरा अभिमान ॥२॥
एक एक तू जोडित भाऊ, घे प्रभुचा अनुराग
भक्तिरसाला भरती येता, होतो नकळत त्याग
भक्तिरसाची किमया मोठी मर्म त्यातले जाण
जीवन आहे देवासाठी, तोच खरा अभिमान ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP