भावगंगा - उठले ! पांडुरंग उठले
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
पंढरि सोडुनि पहा निघाले
उठले ! पांडुरंग उठले ॥धृ॥
हात कटेवरि नाहीत आता
समचरणाची ढळली स्थिरता
माळ तुळशिची नको अनंता
भावशून्य गजरात अहंता पाहुनि ते विटले ॥१॥
आठवला मनि कलिंदी-तट
मुरलीनादे ढळता घुंघट
गतकालातिल रम्य भावपट
कुठे हरपला कालगतीमधि शोधाया सजले ॥२॥
पतित जाहल्या मनास आता
हवी एकली केवळ माता
वत्सलतेचा हात मागुता
गोंजारुनि लडिवाळ सानुला उठवाया उठले ॥३॥
धरली हाती गीतामुरली
मानवता जी उजळि त्रिकाळी
सख्य असावे जीवांजवळी
प्रेम देउनी प्रेम घेउया सांगत ते सुटले ॥४॥
वारकऱ्या रे ! जाग, उठ झणीं
वासुदेव सांगतो अंगणीं
नजर बदल बा ! उठ रोगातुनि
गीतामृत पिउनी घे थोडे गोड गोड सगळे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2023
TOP