भावगंगा - पलटे काल अन् उषा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
पलटे काल अन् उषा उलटे दिन अन् निशा
संकटहारी, एक तूचि अचल रे मुरारी ॥धृ॥
तुझ्या भक्तांचि करिसि तू कामें
जप चाले तुझा त्यांच्या नामे
तुझी अजब प्रीती मी तर मंदमती
संकटहारी, एक तूचि अचल रे मुरारी ॥१॥
तुझ्या प्रेमप्रवाहात न्हावे
तुझ्या दृष्टी-समीप रहावे
सृष्टी बनते मजा, नाही वाटे सजा
संकटहारी, एक तूचि अचल रे मुरारी ॥२॥
तुझ्या प्रीतीचे गीत मी गावे
तुझ्या प्रीतीने जीवन रंगावे
नको मुक्ती मला, भक्तीसंग भला
संकटहारी, एक तूचि अचल रे मुरारि ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP