भावगंगा - तुमच्यामुळेच दादा आनंद जीवनात
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
तुमच्यामुळेच दादा आनंद जीवनात
साऱ्या जीवाच्या चिंता या लोपती क्षणात ॥धृ॥
सौंदर्य ते झळाळे तेजाळ शोभिवंत
अन् तो सुगंध तुमचा सुखकंद मूर्तीमंत ॥१॥
पाहिल जो तुम्हाला तो थोर भाग्यवंत
तुमची सुहास्य मुद्रा औदार्य पूर्ण ज्यात ॥२॥
देणेची ठाऊकी रे घेणे न ते मनात
कोणी असो इथे तो पहा नम्र नम्र होत ॥३॥
आनंद वायूचे या तुम्ही प्रसन्न झोत
अथांग सागरीचे हे ज्ञानही तुम्हात ॥४॥
तुमच्यामुळेच नांदे मांगल्य जीवनात
तुमच्यामुळेच आशा नित्य होत पल्लवीत ॥५॥
खिन्नत्व जावूनी ये नव चेतना मनात
नव अर्थ जीवनाचा जो जागतो क्षणात ॥६॥
आभार काय मानू शब्दापलीकडे जे
या भावनेत सारे समजाल ना तुम्ही ते ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP