भावगंगा - शोध घे, प्रतिशोध नको
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
शोध घे, प्रतिशोध नको; बोध घे परि दंभ नको
मानवतेचे सैनिक आपण भक्ती करू पण भीती नको ॥धृ॥
युवा तुझ्या रे ! खांद्यावरती मानवतेची असे धुरा
विज्ञानाचा अर्थ दाखवुन देव जागवी तूच खरा
शूर हवा परि क्रूर नको, देव हवा परि दैत्य नको ॥१॥
एका-एका युवकामधली शक्ती जागवी भक्तीने
विवेक जागृत करून त्यांना जिंकुन घे रे ! प्रेमाने
दिव्य शक्तिच्या तेजामधली ज्योत हवी, अंधार नको ॥२॥
‘अरे युवानो क्यों शरमाओ गीता गावो मौज मनाओ
भक्तिफेरिमें जाकर अपना मलीन मानस धोकर आओ’
भाषेचाही भेद नको, काळा-गोरा वाद नको ॥३॥
धर्मामर्धामधले अंतर संपुन जाईल असे करा
हिन्दू मुस्लिम शीख इसाई देव एकची आहे खरा
रक्त बनवितो सर्वांचे तो, एकच ही शंकाच नको ॥४॥
पांडवांपुढे कौरव होते तुझ्यापुढे हा काळ खडा
योगेश्वर अर्जुनस लाभे, दादा मिळतिल तुला गड्या
युद्ध पुकारी काळासंगे पुरुषार्थाला लाजु नको ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2023
TOP