मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
कितीक आले गेले

भावगंगा - कितीक आले गेले

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


कितीक आले गेले तरी न त्यांचे झालो
दर्शन तुमचे होता दादा! तुमचे झालो ॥धृ॥
भाग्य आमुचे आज उजळले
कृष्ण सुदामाजवळी बसले
रामप्रभू शबरीस भेटले
तैसे हरवुन गेलो ॥१॥
तुमच्यावरती खिळल्या नजरा
वंदन हे तर तुम्हा दिनकरा!
भावभक्तिचा घ्या हा मुजरा
आम्ही पावन झालो ॥२॥
दादा ! तुमच्याजवळी येता
दुःख, दीनता सरली चिन्ता
कळले जीवन कळली ममता
दैवी वैभव ल्यालो ॥३॥
तुम्ही बोलता अमृत झरते
हसता तुम्ही फूल उमलते
मोरपीसही अलगद फिरते
तुमचे होउन गेलो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP