भावगंगा - मरणाचे स्मरण करा
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
जगतातुनि या जायाचे रे मरणाचे स्मरण करा रे
अमरत्वा प्राप्त करुनि घ्या रे मरणाचे स्मरण करा रे ॥धृ॥
दोन दिसांची धन-संपत्ती
विद्वत्ता अन् सत्ता रे
लोभी तिच्या पडुनी करिसी का
आयुष्याची माती रे ॥१॥
मृगजळरूपी जगात खोट्या
नकोस भ्रमुनी गुंतू रे
दु:खाचे धक्के बसुनीही
जागृत केव्हा होसी रे ॥२॥
जन्म-मरण हे अविरत येते
दु:ख जरि तुज होता रे
होईल पश्र्चाताप पुन्हा रे
घे सुटका तू करुनी रे ॥३॥
जन्म अलौकिक वाया जाई
भोगी जीवन सोडी रे
त्यागातच शान्ती आहे रे
कर सार्थक जन्माचे रे ॥४॥
देवाविण त्या दुसरे कोणी
नाही जगती अपुले रे
निशिदिनि चिंतन करुनी घेई
मोक्षपदाची प्राप्ती रे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP