भावगंगा - याचे पडे पाउल तीच काशी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
याचे पडे पाउल तीच काशी
याचे दर्शन पाप विनाशी; याचे पडे पाउल तीच काशी ॥धृ॥
शुद्ध, स्वस्थ जीवन हो याचे देखावा नच स्पर्शी
सहज, सरळ फिरतो हा जगतीं श्वेतवस्त्र संन्यासी
याचे पडे पाउल तीच काशी ॥१॥
तीर्थस्थान धुंडाळी मानव परिहारा अघराशी
याच्या चरणे पावन बनती गंगेच्या जलराशी
याचे पडे पाउल तीच काशी ॥२॥
पथ निरखित पद टाकित फिरतो हा तर विश्व-प्रवासी
पाणंदही आसुसते हृदयीं चरणधुली कधि न्यासी
याचे पडे पाउल तीच काशी ॥३॥
संग न लागे जगताचा कधि आहे जगतनिवासी
पंकामधल्या पंकजीं पाही निर्मळता अविनाशी
याचे पडे पाउल तीच काशी ॥४॥
नगर-जनांना भेटे स्नेहे परि गमतो वनवासी
पांडुरंग, योगेश्वर-सेवक फिरतो जन-अभिलाषी
याचे पडे पाउल तीच काशी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP